दारुच्या नशेत असताना तुमची पर्सनॅलिटी कशी असते?

तुम्ही कधी विचार केलाय का की दारु एखाद्या माणसाच्या पर्सनॅलिटी आणि हावभावांवर किती प्रभावित ठरते. अमेरिकेच्या मिजुरी युनिर्व्हसिटीच्या रेचल विनोग्राडने या पैलूवर पहिल्यांदा अभ्यास केला. तेव्हा दारु पिणारी माणसे ही चार प्रकारची असतात हे संशोधनात आढळले.

Updated: Dec 20, 2015, 01:21 PM IST
दारुच्या नशेत असताना तुमची पर्सनॅलिटी कशी असते? title=

नवी दिल्ली : तुम्ही कधी विचार केलाय का की दारु एखाद्या माणसाच्या पर्सनॅलिटी आणि हावभावांवर किती प्रभावित ठरते. अमेरिकेच्या मिजुरी युनिर्व्हसिटीच्या रेचल विनोग्राडने या पैलूवर पहिल्यांदा अभ्यास केला. तेव्हा दारु पिणारी माणसे ही चार प्रकारची असतात हे संशोधनात आढळले.

या परीक्षणादरम्यान दारुचा प्रभाव किती वेळापर्यंत राहतो. तसेच नशेत असताना कोण स्वत:वर नियंत्रण ठेवू शकते. याबाबतचा अभ्यास करण्यात आला. दारु प्यायल्यानंतर अनेक व्यक्तींना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांची उत्तरे रेकॉर्ड करण्यात आली. यावर दारु पिणाऱ्यांमध्ये चार प्रकार आढळल्याचे समोर आले. या चार प्रकारांना वेगवेगळी नावेही ठेवण्यात आली.

अर्नेस्ट हेमिंग्वे - या गटातील व्यक्ती नशेत असतानाही लेख हेमिंग्वे यांच्याप्रमाणे बौद्धिकता कायम ठेवतात. साधारण बदलांवर त्यांचा भर असतो. 

मेरी पोपिन्स - या वर्गातील दारु पिणाऱ्या व्यक्ती पिण्याचाही सोहळा साजरा करतात. प्यायल्यानंतरही त्यांना बाजूच्या परिस्थितीची जाणीव असते. जबाबदार असतात. 

द नट्टी प्रोफेसर - या गटातील व्यक्ती इतर वेळी संकोची असल्या तरी प्यायल्यानंतर खुलेपणाने वागतात. कोणतीही रिस्क घेण्यास ते यावेळी तयार होतात. 

मिस्टर हाइड - प्यायल्यानंतर कोणत्याच व्यक्तीशी या सहमत नसतात आणि अधिक प्यायल्यानंतर या व्यक्ती गैरजबाबदार होतात. त्यांना कंट्रोल राहत नाही.