नवी दिल्ली : जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हीरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया()एचएमएसआय) ने BS-III या मॉडेलवर २२, ००० रुपयांची सूट जाहीर केलीये.
गाड्यांचा स्टॉक कमी करण्यासाठी कंपनीने ही सूट जाहीर केलीये. सुप्रीम कोर्टाने एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी दिला.
बीएस-3 गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. ऑटो मोबाईल कंपन्यांच्या व्यावसायिक हितापेक्षा जनतेचे स्वास्थ महत्त्वाचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
मार्केट लीडर हीरो मोटोकॉर्पने बीएस ३ टू-व्हीलर्सवक १२,५०० रुपयांपर्यत सूट देण्याची घोषणा केलीये. डीलर्सच्या मते कंपनीने आपल्या स्कूटर्सवर १२, ५०० रुपयांची सूट, प्रीमियम बाईक्सवर ७,५०० रुपयांची सूट आणि एंट्री लेव्हल मास मार्केट मोटारसायकलवर ५००० रुपयांची सूट जाहीर केलीये. दरम्यान ही ऑफर ३१ मार्चपर्यंत असणार आहे.