नवी दिल्ली : रिलायन्स जिओचा 'फ्री' टाईम 31 डिसेंबरला संपल्यानंतर काय? असा प्रश्न तुमच्यासमोर असेल... आणि तुम्हीही स्वस्तातल्या डाटा प्लानसाठी सर्च करत असाल तर एक नवीन ऑप्शन तुमच्यासमोर आलाय.
जिओला टक्कर देण्यासाठी एका कंपनीनं चक्क 17 रुपये महिना दरात डाटा देणार असल्याचं जाहीर केलंय. कॅनडाची मोबाईल हॅन्डसेट मेकर कंपनी 'डेटाविंड'नं 200 रुपयांत वर्षभरासाठी इंटरनेट डाटा प्लान देण्याची योजना बनवलीय. यासाठी कंपनीनं आपल्या दूरसंचार सेवा बिझनेसमध्ये जवळपास 100 करोड रुपयांची गुंतवणूकही व्यवस्थाही केलीय.
स्मार्टफोन आणि टॅबलेट बनवणाऱ्या 'डाटाविंड'ला देशात नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर बनण्यासाठी लायसन्सची गरज लागणार आहे. यासाठी त्यांनी अर्जही केलाय. एका महिन्यात हे लायसन्स हातात पडण्याची आशा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी व्यक्त केलीय. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवणुकीची गरज कंपनीला पडेल.
जिओचा 300 रुपयांचा प्लान केवळ अशा व्यक्तींसाठी योग्य आहे जो महिन्याला 1000-1500 रुपये खर्च करतात. परंतु, इतर व्यक्ती मात्र महिन्याला 90 रुपये खर्च करतात... त्यांच्यासाठी हा प्लान योग्य ऩाही... आणि अशाच ग्राहकांवर डाटाविंडनं आपलं लक्ष केंद्रीत केलंय, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.
'डाटाविंड'च्या प्लानमध्ये इंटरनेटसाठी एका वर्षासाठी 200 रुपयांपेक्ष जास्त रुपयांची गरज भासणार नाही.