व्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....

'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.

Updated: Sep 22, 2015, 09:52 AM IST
व्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण.... title=

मुंबई : 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलंय. या पॉलिसीमधून वेब अॅप्लिकेशन्स, सोशल मीडिया साईटस् आणि सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स उदाहरणार्थ व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, इंटरनेट बँकिंग, पेमेंट गेटवे आणि ई-कॉमर्स या गोष्टी वगळण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. 

काय दिलं गेलंय स्पष्टीकरण पाहा... 
'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मधून खालील गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत.

अधिक वाचा - काय म्हटलंय सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मध्ये...

- वेब अॅप्लिकेशन, सोशल मीडिया साईटस आणि सोशल मीडिया अॅप्लिकेशन उदा. व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर 

- भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट गेट वे साठी वापरण्यात येणारी SSL / TLS एनक्रिप्शन उत्पादनं 

- ई कॉमर्स आणि पासवर्ड आधारित व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी SSL / TLS एनक्रिप्शन उत्पादनं 

या गोष्टींचा 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मध्ये समावेश होणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलंय. 

एनक्रिप्शन म्हणजे काय?
एनक्रिप्शन म्हणजे एखाद्या कुलुपाप्रमाणे काम करतं. ज्यामुळे तुमचा डाटा सुरक्षित राहण्यास मदत होते. जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तरच तुम्ही एखादी एनक्रिप्टेड फाईल उघडून वाचू शकता. 

पासवर्ड टाकल्यानंतर ही फाईल डिक्रिप्ट होऊन प्लेन टेक्स्टमध्ये बदललं जातं. स्मार्ट कार्ड, सिम कार्ड अशा गोष्टींसाठीही एनक्रिप्शनचा वापर केला जातो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.