मुंबई: सोशल नेटवर्किंग साईट ऑर्कुट गूगल बंद करणार आहे. आपलं लक्ष गूगल यू-ट्यूब, ब्लॉगर आणि गूगल प्लस या सेवांवर केंद्रित करणार आहे.
गूगलनं सांगितलं की या सेवा जास्त लोकप्रिय होत आहेत. त्यामुळं आपलं लक्ष ते त्यावर केंद्रित करणार आहेत.
10 वर्षांपूर्वी सुरू झालेलं ऑर्कुट सप्टेंबर महिन्यात बंद होईल, गूगलचे इंजिनियरिंग निर्देशक पॉल गोलघर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय, ‘मागील 10 वर्षांमध्ये यू-ट्यूब, ब्लॉगर आणि गूगल प्लस जास्त लोकप्रिय झाले आहेत.’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.