फोर्डची नवी कार लवकरच भारतात

अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी फोर्ड आपली अशी मस्टँग कार भारतात लाँच करणार आहे.

Updated: Jan 29, 2016, 07:29 PM IST
फोर्डची नवी कार लवकरच भारतात title=

नवी दिल्ली: अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी फोर्ड आपली अशी मस्टँग कार भारतात लाँच करणार आहे. मस्टँग या कारला सगळ्यात पहिले 1964 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. फोर्ड ही आपली सिडान मस्टँग कार यंदाच्या वर्षीच भारतात लाँच करायच्या तयारीमध्ये आहे. लवकरच होणाऱ्या ऑटो एक्सपो मध्येही ही कार शोकेस करण्यात येणार आहे.

काय आहेत मस्टँगचे फिचर्स

फोर्डची ही मस्टँग कार पहिलीच 2 डोर रियर व्हील ड्राईव्ह असलेली स्पोर्ट्स कार आहे. याआधी मस्टँग लेफ्ट हँड ड्राईव्ह फंक्शन सह उपलब्ध होती. या कारमध्ये 5.0 लीटर व्ही 8 इंजिन लावण्यात आलं आहे. याचबरोबर मस्टँगमध्ये नॉर्मल, स्पोर्ट+, ट्रॅक आणि वेट हे चार ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत. तसंच फोर्डच्या या गाडीत सिंक-3 इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक वायपर्स, स्टार्ट-स्टॉप बटण आणि एडॉप्टिव्ह क्रुज कंट्रोलही आहे. कंपनीनं या कारच्या किमतीबाबत मात्र कोणताही खुलासा केलेला नाही.