अवघ्या २१ सेकंदात विकले गेले ३० हजार कूल पॅड नोट३ लाइट

चायनीज स्मार्टफोन कंपनी असलेल्या कूल पॅड नोट३ लाइटला ग्राहकांची पसंतीची पावती मिळतेय. अवघ्यास२ २१ सेंकदात ३० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय. या फोनची विक्री अॅमेझोनवर होत आहे. अवघ्या सहा हजार ९९९ रुपयांत हा स्मार्टफोन मिळतोय. 

Updated: Jan 29, 2016, 03:24 PM IST
अवघ्या २१ सेकंदात विकले गेले ३० हजार कूल पॅड नोट३ लाइट title=

नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन कंपनी असलेल्या कूल पॅड नोट३ लाइटला ग्राहकांची पसंतीची पावती मिळतेय. अवघ्यास२ २१ सेंकदात ३० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय. या फोनची विक्री अॅमेझोनवर होत आहे. अवघ्या सहा हजार ९९९ रुपयांत हा स्मार्टफोन मिळतोय. 

या कूलपॅड नोट ३ लाइटमध्ये पाच इंचाची स्क्रीन आहे. यात ६४ बिट १.३ गिगाहर्टझ मीडियाटेक क्वाड कोर प्रोसेसर आहे. यात ४ जीबी ऱॅम आहे. तसेच १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. 

या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलाय. तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यात बॅटरीची क्षमता २५००mAh देण्यात आलीये. तसेच ५.१ लॉलीपॉप अँड्रॉईड देण्यात आलेय.