केवळ सात वर्षांत 'फ्लिपकार्ट'चे मालक झाले खरबपती!

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना त्यांच्याच शहरात जबरदस्त टक्कर मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या बाबतीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलंच मागे आहेत... 

Updated: Jul 30, 2014, 03:37 PM IST
केवळ सात वर्षांत 'फ्लिपकार्ट'चे मालक झाले खरबपती! title=

बंगळुरू : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना त्यांच्याच शहरात जबरदस्त टक्कर मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या बाबतीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलंच मागे आहेत... 

‘फ्लिपकार्ट’ची युक्ती लढवून सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी आत्तापर्यंत जवळपास 1 अरब डॉलर (6000 करोड रुपये) पेक्षा जास्त संपत्ती मिळवलीय. त्यामुळे, आता सचिन आणि बिन्नी बन्सलचा कंपनीतील वाटा जवळपास 15 टक्क्यांवर पोहचलाय. त्यांची एकूण संपत्ती 1.05 अरब डॉलर म्हणजेच 6000 करोड रुपयांहून अधिक झालीय. 

मूर्ती कुटुंबातील चार सदस्यांची एकूण संपत्ती जवळपास 8,700 करोड रुपये आहे... मूर्ती हे देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. शिवाय बंगळुरूचे नंदन निलकेणी यांच्या कुटुंबाची संपत्ती आहे 6500 करोड रुपये. 
जगभरात आयटी कंपन्यांनी फारच कमी वेळात जास्त प्रगती केल्याची अनेक उदाहरणं आहेत. 

अमेरिका आणि चीनच्या इंटरनेट मार्केटनं अनेक अरबपती उद्योगपतींना उजेडात आणलंय. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती जवळपास 33 अरब डॉलर आहे. तर ‘अलीबाबा’चा संस्थापक जॅक मा याची संपत्ती 12.5 अरब डॉलर आहे. 

गंमत म्हणजे, सचिन आणि बिन्नी सध्या कंपनी लिस्टेड होण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर ते आपल्या संपत्तीचा अनुमान लावू शकतील. 

महत्त्वाचं म्हणजे, इन्फोसिस ही चार दशकांहून जुनी कंपनी आहे आणि तिचं मार्केट कॅपिटल जवळपास 30 अरब डॉलरच्या जवळपास आहे. तर ‘फ्लिपकार्ट’ला केवळ 7 वर्षांचा इतिहास आहे... आणि तरीही या कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन जवळपास 7 अरब डॉलरच्या जवळपास आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.