पाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष

आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?

Updated: Feb 3, 2016, 01:07 PM IST
पाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष title=

मुंबई : आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?

पण, हे समजणं आता शक्य होणार आहे. एखाद्या नवीन व्यक्तीला तुम्ही भेटता... त्यानंतर अनेक वेळ त्याच्याशी गप्पा मारता आणि घरी जाऊन त्याला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवता... पण, समोरून त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. 

अशावेळी खरोखरच ही फ्रेन्ड रिक्वेस्ट पलिकडच्या व्यक्तीनं पाहिली नाही की पाहून न पाहिल्यासारखी केलीय... हे जाणून घेणं आता फेसबुकवर शक्य होणार आहे. 


इथे पाहा

यासाठी तुम्हाला फ्रेन्ड रिक्वेस्ट टॅबवर जावं लागेल... इथे 'see all' वर क्लिक करा. इथे तुम्हाला आलेल्या सगळ्या फ्रेन्ड रिक्वेस्ट दिसतील. 

वरच्या बाजुला 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'च्या हेडिंगखाली एक 'view sent requests' अशी हायपरलिंक दिसेल. त्यावर क्लिक करा आणि मग पाहा... तुमच्या फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कुणी कुणी दुर्लक्ष केलंय ते...