फेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!

फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे. 

Updated: Jul 10, 2015, 08:53 AM IST
फेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता! title=

मुंबई : फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे. 

खरं तर 'फ्रेंडस' आयकॉन इतका छोटा आहे की पहिल्यांदा तुम्ही पाहिलं तरी तुमच्या हा फरक लवकर लक्षात येणार नाही. पण, लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आता या आयकॉनवर दिसणाऱ्या महिला आणि पुरुषाच्या स्थानांमध्ये आणि प्रतिकृतीतही बदल करण्यात आलाय. 

फेसबुकच्या या फ्रेंडरस आयकॉनमध्ये आत्तापर्यंत पुढे पुरुषाची आकृती तर त्याच्या मागे महिलेची आकृती दिसत होती. पण, आता मात्र या आयकॉनमध्ये बदल करत पुढे महिलेची आकृती तर मागे पुरुषाची आकृती दिसतेय. इतकंच नाही, तर पुरुष आणि महिलेच्या केसांची आणि शारीरिक आकृतीही बरोबरीतच ठेवण्यात आलीय...  यात महिला आणि पुरुषांना बरोबरीचं स्थान देण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.

हा बदल पाहण्यासाठी तुम्हाला फेसबुक पेजच्या उजव्या वरच्या बाजुला कोपऱ्यात पाहू शकता. इनबॉक्स मॅसेजच्या बाजुला हा 'फ्रेंडस' आयकॉन दिसतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.