फेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट

फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.

Updated: Oct 11, 2014, 05:18 PM IST
फेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट title=

नवी दिल्ली : फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी झुकरबर्गला स्वच्छ भारत अभियानाची माहिती दिली. सर्वात आधी मार्क झुकरबर्गने सकाळीच केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा केली होती.
 
झुकरबर्गने पंतप्रधान मोदींबरोबर मानवी कल्याणासाठी माहिती तंत्रज्ञान कसं वापरता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा केली. फेसबुकचा जास्तीत जास्त वापर प्रशासनाला सर्वसामान्य जनतेशी जोडण्यासाठी कसा करता येईल, यावर झुकरबर्गने भर दिला. 
 
फेसबुकला भारत सरकारबरोबर सहकार्याने काम करायचं असून, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याला फेसबुक खूप मोठी कामगिरी बजावू शकतं असा विश्वास मार्कने पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.