मुंबई : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. लवकरच इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एक्सिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यताय.
इंजिनिअरींगची पदवी मिळवूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांना अपेक्षित ते ज्ञान असतंच असं नाही. त्यामुळे नव्यानं पास होणाऱ्या इंजिनिअर्सकडून उद्योगांना अपेक्षित असा कुशल कर्मचारी मिळतच नसल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे.
त्यावर तोडगा काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांची एक्झिट टेस्ट घेऊन त्यांची नोकरीच्या बाजारात उभं राहण्याची पात्रता आहे का? या छडा लावण्यात येणार आहे. सध्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट द्यावी लागते.