16 मेगापिक्सलचा कॅमेरा 4 GB रॅम, नोकिया 6 ची घोषणा

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये नोकियानं पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.

Updated: Jan 8, 2017, 10:12 PM IST
16 मेगापिक्सलचा कॅमेरा 4 GB रॅम, नोकिया 6 ची घोषणा  title=

मुंबई : स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये नोकियानं पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. नोकियानं नुकताच नोकिया 6 या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. सध्या तरी हा फोन चीनमध्येच उपलब्ध असला तरी लवकरच JD.com या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. या फोनची किंमत जवळपास 16,750 एवढी असेल. 

काय आहेत या फोनचे फिचर्स 

5.5 इंचाचा एचडी डिसप्ले आणि 2.5Dची गोरिला ग्लास 

क्वालकोम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, X6 LTE modem

4GB रॅम, 64 GB इंटरनल मेमरी आणि एसडी कार्ड टाकून एक्सपांडेबल मेमरी 

एन्ड्रॉईड 7.0 नोगट 

16 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

3,000mAh बॅटरी