कंपनीने 'फ्रीडम २५१'ची विक्री थांबवली

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ खरेदी करण्याची इच्छा असलेल्या लाखो लोकांच्या पदरी आज निराशा पडली. 

Updated: Feb 18, 2016, 02:02 PM IST
कंपनीने 'फ्रीडम २५१'ची विक्री थांबवली title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ खरेदी करण्याची इच्छा असलेल्या लाखो लोकांच्या पदरी आज निराशा पडली. सुरुवातीला बुकिंग सुरु होताच वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर पेमेंट प्रोसेसमध्ये समस्या येऊ लागल्या आणि आता कंपनीने या स्मार्टफोनची विक्री थांबवलीये. 

फ्रीडम २५१साठी बुकिंग करताना Buyवर क्लिक केल्यास एक पेज ओपन होते. त्यात कंपनीने मेसेज दिला आहे. यात मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहोत. दर सेकंदाला आमच्या साईटवर साधारण ६ लाख हिट्स मिळतायत. तुमच्या जबरदस्त प्रतिसादामुळे सर्व्हर ओवरलोड झालाय. त्यामुळे बुकिंग सध्या थांबवण्यात आलीये. २४तासांच्या आत पुन्हा भेटू, असं कंपनीने म्हटलंय.

सकाळी सहा वाजल्यापासून या स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरु झाली होती. याची किंमत २५१ रुपये असून शिपींग चार्जेस ४० रुपये आहेत. जून २०१६पर्यंत हा फोन ग्राहकांना मिळणार आहे.