नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिग बेल्सने बुधवारी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. तसेच गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून बुकिंग सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले.
इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने लोकांनी सकाळीच वेबसाईटवर बुकिंगसाठी गर्दी केली मात्र वेबसाईटवर जाताच ते निराश झाले. आधी वेबसाईट क्रॅश त्यानंतर पेमेटेंची समस्या. इतक्यावरच थांबले नाहीत. तर या स्मार्टफोनसाठी ४० रुपये शिपींग चार्ज द्यावे लागणार आहेत. म्हणजे या स्मार्टफोनसाठी तुम्हाला केवळ २५१ रुपये नव्हे तर २९१ रुपये द्यावे लागतील.
http://www.freedom251.com/ या वेबसाईटवर याची बुकिंग सुरु असून याच्या डिलीव्हरीसाठी कंपनीने ४ महिन्यांचा कालावधी घेतलाय.