नवी दिल्ली : रिलायन्स जिओची फ्री सर्व्हिस ३१ मार्चला संपतेय. मात्र त्यानंतर मोफत कॉलिंग आणि फ्री डेटा सर्व्हिससाठी ग्राहक जिओ वापरण्यासाठी इच्छुक आहेत. रिसर्च आणि ब्रोकरेज कंपनी बर्नस्टेनच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये.
सर्व्हनुसार सध्या ६७ टक्के ग्राहकांनी जिओ सिमला सेकंडरी सिम म्हणून ठेवलेय. ६३ टक्के ग्राहक जिओला नवा प्रायमरी ऑपरेटर बनवण्यास उत्सुक आहेत. तर २८ टक्के ग्राहकांचे असे म्हणणे आहे की ते जिओला सेकंड सिम म्हणून कायम टेवणार आहेत. फक्त २ टक्के ग्राहक ३१ मार्चनंतर सिम वापरणार नाहीयेत.
रिपोर्टनुसार कस्टमर लॉयल्टीच्या बाबतीत लोकांनी जिओला अधिक मार्क दिलेत. यात कस्टमर सर्व्हिस, डेटा कव्हरेज, डेटा स्पीड दुसऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. इतकंच नव्हे तर जिओने व्हॉईस क्वॉलिटी आणि व्हॉईस कव्हरेजमध्ये वोडाफोन आणि आयडियालाही मागे टाकलेय.