पुटकुळ्या, सुरकुत्यांवर योगासनांचा इलाज

चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका आणि वयाप्रती येत जाणाऱ्या सुरकुत्या ही सगळ्याच महिला वर्गाची समस्या आहे. वयात येताना मुलांच्या चेहऱ्य़ावर मुरुमं, पुटकुळ्या येतात. या वयात अशा पुटकुळ्या चेहऱ्याची शोभा घालवतात. तसंच वय वाढत जातं तसतशा चेहऱ्यावरील तेज कमी होत जातं. कांती निस्तेज होत जाते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 27, 2012, 02:02 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका आणि वयाप्रती येत जाणाऱ्या सुरकुत्या ही सगळ्याच महिला वर्गाची समस्या आहे. वयात येताना मुलांच्या चेहऱ्य़ावर मुरुमं, पुटकुळ्या येतात. या वयात अशा पुटकुळ्या चेहऱ्याची शोभा घालवतात. तसंच वय वाढत जातं तसतशा चेहऱ्यावरील तेज कमी होत जातं. कांती निस्तेज होत जाते. सुरकुत्या पडू लागतात. यावर एक सोपा उपाय आहे आणि उपाय देखील स्वस्तातला घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.
चेहऱ्यावरील पुटकुळ्या आणि सुरकुत्या यांपासून सुटका करून घेण्यासाठी चेहऱ्याची योगासनं करावीत. नियमित योगासनांबरोबरच चेहऱ्याशी संबंधित काही योग क्रिया केल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. या योगामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊन त्वचा तजेलदार बनते. चेहरा तेजस्वी बनतो.
विदेशात बऱ्याच स्त्रिया यूट्युबवरील व्हिडिओ पाहून ही योगासनं शिकत आहेत. डेली मेल या वर्तमान पत्रामध्ये आहार तज्ज्ञजोसी गोल्डबर्ग म्हणाले चेहऱ्याचे योग खूप गमतीदार अशी ही योगासनं करताना मजाही येते आणि याचे फायदेही खूप होतात. मी मित्रांच्या एका ग्रुपला हे योग करायला सांगितले आणि त्यांना याचा फायदा झाला. त्यामुळे मी अनेकांना आता ही योगासनं करायचा सल्ला देतो.