मुंबई : कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात? तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो.
1) वेळ : कोणत्याही महिलांच्या समाधानीबद्दल विचार केला तर आपल्या जोडीदाराचा किवा पतीचा वेळ हा खूप महत्त्वाचा विषय असतो. दिवसातून ३० मिनिट हे आपल्या पतीचे आपल्यासाठी कोणत्याही अडथळ्याविना मिळाले तर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि समाधान देणारे असतात. साधारण २४ टक्के महिला असमाधानी असतात कारण त्याचे पती त्यांच्यासाठी पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ देत नाही.
स्वतःला विचार , आपण आपल्या पतीसाठी किंवा पत्नीसाठी किती काळ देतो. यात फोनवरील संभाषण आणि इतर गोष्टींचा समावेश करू नका. विना अडथळा निर्माण करता किती काळ पत्नीसोबत घालवतात.
२) प्रशंसा : सध्याच्या काळात पत्नी ही मुलांची काळजी घेते तसेच बाहेर जाऊन पैसेही कमवून आणते. पण त्यांची कोणीही प्रशंसा किंवा कौतुक करत नाही. त्यामुळे आपल्या पत्नीचे कौतुक केले असे वागल्यास आणि बोलल्यास त्या समाधानी होतात.
३) समजून घेणे : आपल्या पतीने आपल्या समजून घेतले पाहिजे असे प्रत्येक पत्नीला वाटत असते. तसेच महिलांसाठीही हे महत्वाचे आहे की आपल्या पतीने आपल्या समजून घेण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. पुरूषांना माहिती नसते की आपण कोणाचे ऐकून घेऊ शकत नाही. ते समजून द्यायला हवे.
महिलांनी आपल्या पतीच्या मागे लागू नये. पुरूष कामात असताना त्यांनी सांगावे की मला १० मिनिटं बोलायचं आहे. खूप जरूरी आहे. त्यावेळी पुरूष ते ऐकण्याच्या मनस्थितीत येतात. सतत आणि सदैव बोलत राहिल्यास पुरूष न ऐकण्याच्या मनस्थितीत जातात.
४) फन : पहिल्या मुलानंतर पती पत्नीतील मजा मस्करी आणि फन गायब होते. नोकरी, जागे भाडे, व्याज अशा सर्व गोष्टी नातेसंबंधात डोकावतात. जोडप्याने एखादी रात्र, किंवा आठवड्यातून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. जवळपास दोन तास एकमेंकासोबत घालविला पाहिजे. यात सर्व गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. त्यात काम, पैसा आणि मुलांसंदर्भात बोलले पाहिजे.
५) हाव भाव : मिठी, चुंबन, अनपेक्षित फोन कॉल आणि त्यावर आय लव यू अशा छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्या पार्टनरचे पाच टच पॉइंट असतात. त्यावर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. त्यासाठी केवळ ३० सेकंद तुम्हांला लागतात आठवड्यातून एकदा हे टच पाइंट आपल्या हावभावातून प्रेरित केले पाहिजे. त्यामुळे तुमचे नाते अजून मजबूत होण्यास मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.