थंडीत डँड्रफ फ्री सुंदर केसांसाठी ४ घरगुती उपाय

त्वचा आणि केसांवर थंडीमध्ये खूप जलद परिणाम होतो. शुष्क मौसमात केस आणि त्वचा कोरडी पडते. प्रत्येक हवामानात केसांच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. 

Updated: Dec 7, 2015, 07:50 PM IST
थंडीत डँड्रफ फ्री सुंदर केसांसाठी ४ घरगुती उपाय title=

नवी दिल्ली : त्वचा आणि केसांवर थंडीमध्ये खूप जलद परिणाम होतो. शुष्क मौसमात केस आणि त्वचा कोरडी पडते. प्रत्येक हवामानात केसांच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. 

थंडीची दिवसात केस ड्राय होणे, कोंडा होणे, डोक्याची त्वचा कोरडी पडणे समस्या भेडसावतात.  जाणून घ्या केसांच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काही घरगुती उपाय 

कडूनिंबाची पाने 

कडूनिंबाच्या पानांचा वापर केस गळणे आणि कोंड्याच्या समस्येतून मुक्ती मिळण्यासाठी होतो. कडूनिंबामद्ये एन्टी सेप्टीक, एन्टी व्हायरल, आणि एन्टी बॅक्टेरिअल गुण असतात. कडू निंबाच्या पान आणि कोरपडची पेस्ट बनवून लावा, त्यानंतर अर्धा तासानंतर कोंबट पाण्याने केस धुऊन घ्या. 

कोथिंबीर पान 
कोथिंबीरीच्या पानांचे पेस्ट बनवून ती डोक्याच्या त्वचेला लावा. त्यानंतर अर्धा तासानंतर कोंबट पाण्याने केस धुऊन घ्या. 

मेहंदी आणि बीट
मेहंदी आणि बीटाची पाने एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. केस गळतीवर हा चांगला उपाय आहे. त्यानंतर बीटाची पाने आणि हळद पावडर एकत्र करून डोक्याच्या त्वचेला लावा हा देखील चांगला उपाय आहे. या पेस्टचा वापर रोज करायला हवा. 

कढीपत्ता 
केस वाढविण्यासाठी आणि काळे करण्यासाठी एक सर्वात चांगला उपाय आहे. १०० नारळाच्या तेलात कढीपत्ते मिक्स करून १५ मिनिट उकळवा... तेल थंड झाल्यावर ते डोक्याच्या त्वचेला लावा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.