मध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 8, 2013, 09:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झालाय. तर काँग्रेसनंही अनेक दिग्गज नेत्यांना बाजुला सारून ज्योतिरादित्य शिंदेंच्या तरुण नेतृत्वात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या सत्तेच्या रणसंग्रामात प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या.
काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला खाण आणि डंपर घोटाळ्यांवरून घेरलं. याच प्रकरणात भाजपचे १४ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा मुद्दा काँग्रेसनं लावून धरला. मात्र यातले १३ जण लोकायुक्तांच्या चौकशीच्या फेऱ्यात असूनही सरकार त्यांना पाठिशी घालत असल्याचा मुद्दाही काँग्रेसनं उपस्थित केला.
तर भाजपनं प्रचारात गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. अटल ज्योती अभियाना अंतर्गत २४ तास वीज पुरवठा. लाडली योजने अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत. ग्रामीण भागात रस्त्यांचं उभं केलेलं जाळं हे भाजपचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते.
मात्र तरीही काँग्रेस आणि भाजपनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा जोरदार पाऊस पाडला. भाजपनं गरीबांना एक रुपये किलोनं तांदूळ देण्याचं आश्वासनं दिलंय. तर काँग्रेस गरिबांना ३५ किलो तांदूळ मोफत देणार आहे. भाजप गरिब शेतकऱ्यांसाठी १५ लाख घरं बांधणार आहे. तर काँग्रेसनं शेतकऱ्यांना ५१ हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केलीय. भाजपनं पाच लाख युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिलंय. तर काँग्रेसनं युवकांना बेरोजगार भत्ता देण्याचं वचन दिलंय.
भाजपमध्ये नेतृत्व ही जमेची बाब असली तरी दहा वर्षांच्या सत्तेमुळं प्रस्थापितविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. तर शिवराज यांची स्वच्छ प्रतिमा आणि नेतृत्वाबाबत असलेलं संभ्रमाचं वातावरण काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.