छत्तीसगढ: भाजप-काँग्रेसमध्ये घमासान, रमण सिंह यांची हॅट्रटीक?

आता पाहुयात छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये घमासान रंगलंय. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ५० जागांवर विजय मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं. काँग्रेसला केवळ ३८ जागा मिळवता आल्या. तर बसपाच्या खात्यात २ जागा गेल्या.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 8, 2013, 08:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
आता पाहुयात छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये घमासान रंगलंय. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ५० जागांवर विजय मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं. काँग्रेसला केवळ ३८ जागा मिळवता आल्या. तर बसपाच्या खात्यात २ जागा गेल्या.
मुख्यमंत्री रमण सिंह यांनी हॅट्रटीक साधण्यासाठी दिवस-रात्र एक केले आहेत. काँग्रेसला मात्र नेतृत्वाविनाच ही निवडणूक लढवावी लागली आहे. काँग्रेसनं मुख्य़मंत्री रमण सिंह सरकारवर ३० हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करत प्रचारात रंग भरले. रमण सिंह यांच्या निकटवर्तींयांना खाणींच्या वाटपावरूनही काँग्रेसनं भाजपला लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेस नेते मारले गेल्यानं सुरक्षेच्या मुद्यावरही काँग्रेसनं भाजपला घेरलं. तर भाजपनं केंद्रातले घोटाळे आणि महागाईवरून काँग्रेसला लक्ष्य केलं. मात्र अन्न सुरक्षा कायदा करणारं पहिलं राज्य हाच रमण सिंहांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता.
मात्र दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष रंगला तो जाहीरनाम्यावरून भाजपनं जाहीरनाम्याची कॉपी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात गरिबांना ३५ किलो तांदूर मोफत पुरवण्याचं आश्वासन दिलंय. तर भाजप गरिबांना एक रुपये किलोनं तांदूळ देणार आहे. काँग्रेसनं शेतीसाठी मोफत विजेचं आश्वासन दिलंय. तर भाजप शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणार आहे. काँग्रेसनं धानसाठी दोन हजार रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केलीय. तर भाजपनं २१०० रुपयांचा हमीभाव जाहीर केलाय.
भाजपची मदार रमण सिंह यांनी राबवलेल्या योजनांवर असली तरी नक्षलग्रस्त बस्तरनं भाजपला सत्तेवर आणलंय. मात्र याच बस्तरमध्ये काँग्रेस नेत्यांवरील झालेल्या हल्ल्यामुळं सहानुभुतीचीही लाट आहे. त्य़ामुळं भाजपच्या विकासाचा असर होणार की सहानुभुतीची लहर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.