www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होतेय. या पोटनिवडणुकीत एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या दोन प्रभागांत रविवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. ठाणे महापालिकेच्या सत्तेचं समीकरण बदलवणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. प्रभाग क्रमांक ५१ अ आणि प्रभाग क्रमांक ५७ ब इथे पोटनिवडणूक झालीय. सध्या महापालिकेत १३० जागांपैकी ६४ जागा आघाडीकडे तर ६४ जागा महायुतीकडे आहेत. त्यातला ५७ ब हा मुंब्र्यातला प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र ५१ अ मध्येही काँग्रेसचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीवर ठाणे महापालिकेचं सत्तासमीकरण अवलंबून आहे.
पालिकेतलं सध्याचं पक्षिय बलाबल पाहूया…
महायुती : ६४ (शिवसेना : ५३, बीजेपी: ७, आरपीआय : १, बसपा : २, अपक्ष : १)
आघाडी : ६४ (एनसीपी : ३४, काँग्रेस : १८, मनसे : ७, अपक्ष : ६)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.