राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसवर नाराज

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाचा तिढा सुटण्याची शरद पवारांना आशा आहे. दोन्ही पक्षांमधला हा वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा पवारांनी व्यक्त केलीय. तसंच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 12, 2013, 03:15 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, रोहा
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाचा तिढा सुटण्याची केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रैसचे अध्यक्ष शरद पवारांना आशा आहे. दोन्ही पक्षांमधला हा वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा पवारांनी व्यक्त केलीय. तसंच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
कलंकित नेत्यांनी निवडणूक लढवण्याबाबतचा वटहुकूम मागे घेण्यात काही गैर नसल्याचं सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी यूपीए सरकारची पाठराखण केली आहे. सरकार अनेकदा निर्णय घेतं आणि ते मागेही घेतं.. त्यात काही चुकीचं नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे सूचना शरद पवार यांनी आज रायगडमध्ये दिली.पवार आज रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. तेलंगणाच्या मुद्यावरुन केंद्रात आणखी काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
साखर कारखाना गैरव्यवहारांवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी केलेल्या आरोपांचा शरद पवारांनी चांगलात समाचार घेतला आहे. सध्या आरोप करण्याची फॅशन झाल्याचा टोला पवारांनी लगावला आहे. तसंच आपलं गणित कच्चं असून दहा हजार कोटी म्हणजे किती हे आपल्याला कळत नसल्याची खोचक टीका पवार यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचेही शरद पवार यांनी रोह्यात पुन्हा एकदा म्हटलं आहे. फेब्रुवारीत राज्यसभेच्या आठ जागा रिक्त होत आहेत. त्यातील दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यातल्या एका जागेवरून पवार राज्यसभेत जाणार आहेत या चर्चेतही तथ्य असल्याचं ते म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.