www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
शिवसेनेच्या नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी शिवसेनेच्याच महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना ठाणे महापालिकेत घडली.
ठाणे शहर विकास आराखड्यासंदर्भातील प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला बोलण्याची परवानगी दिल्यानं ही घोषणाबाजी करण्यात आली. शहर विकास आराखड्यासंदर्भात सल्लागार नेमावा आणि यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करावी असा प्रस्ताव महासभेत आला होता.
त्याला विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध केला. त्यानंतर सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही महापौरांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांना बोलण्याची परवानगी दिली. त्याविरोधात शिवसेना नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.