www.24taas.com, जैतापूर
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत. आज प्रकल्पग्रस्तांनी याच मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
जैतापूर प्रकाल्पाविरोधात मागील हिंसक आंदोलनं लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने आंदोलन मोडून काढण्याची जय्यत तयारी केलीय. सुमारे दोनशे स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा प्रकल्पस्थळी आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला शिवसेनेनं सक्रिय पाठींबा दिल्यानं आजच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
प्रकल्पस्थळी जाण्यापासून आंदोलक आणि शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. आंदोलनाला जैतापूर नाते, माडबन, मिठ्गावाने, धारतले या गावांसह रत्नागिरीतूनही आंदोलक सहभागी होणार आहेत.