www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणुक होतेय. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे, काँग्रेसकडून जीतू भोईर आणि मनसेकडून राजन मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजार सुरु झालाय.
सर्वच पक्षांनी रणनिती आखलीये. मनसेच्या उमेदवारीमुळे शिवसेनेसाठी ही निवडणुक मोठी आव्हान बनलीय. भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावडे या दोन दिवसांपासून संपर्कात नसल्याने युतीमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. तर काँग्रेसचे नगरसेवक आयुब कुरेशी हे परदेशवारीवर असल्याने कॉंग्रेसमध्ये देखील अस्थिरता आहे.
मात्र आयुब कुरेशी हे संपर्कात असून ते आज मतदान करण्यासाठी येतील असा दावा कॉंग्रेसचे गट नेते सचिन पोटे यांनी केलाय. स्थायी समितीमध्ये शिवसेना - 6, भाजप - 1, राष्ट्रवादी -2, कांग्रेस -2, मनसे -4, आणि अपक्ष - 1 असे पक्षीय बलाबल आहे. तीन उमेदवार रिंगणात राहिल्यास शिवसेनेचा विजय सहज आहे.
मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे युती झाल्यास शिवसेनेचा पराभव होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.