शेकाप नेते दि. बा. पाटील यांचं निधन

रायगडचे माजी खासदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८७ वर्षांचे होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 24, 2013, 12:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
रायगडचे माजी खासदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८७ वर्षांचे होते.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. उरणमधल्या साडेबारा टक्याच्या का यद्याचे जनक म्हणूनही ते ओळखले जात. माजी विरोधी पक्ष नेते असलेले पाटील यांनी सातवेळा आमदार होते. सामान्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला अशी खंत त्यांच्या निधनानंतर व्यक्त केली जातेय.
दिनकर बाळू पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावात १३ जानेवारी, १९२४ रोजी झाला होता. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत वकिलीचं शिक्षण घेतलं. पनवेल नगराध्यक्ष,महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे २ वेळा खासदार अशी अनेक पदं त्यांनी भूषविली. शेतकरी कामगार पक्षातील एकेकाळचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे पाटील नंतर शिवसेनेत दाखल झाले. मात्र, नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त घेणेच पसंत केलं.

दि. बा. पाटील यांनी १९८४ मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींसाठी आंदोलनाचं नेतृत्व केलं. २३ मार्च २०१० साली जेएनपीटीसाठी १२.५ टक्के जमिनीच्या आंदोलनाचंही नेतृत्व दि. बा. पाटील यांनी केलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.