नोकियाचा `ल्युमिया १५२०` भारतात लॉन्च!

सर्वात टिकावू म्हणून नावलौकिक मिळवणारे अनेक फोन ‘नोकिया’ कंपनीनं बाजारात आणलेत. आता, याच कंपनीचा ल्युमिया १५२० हा स्मार्टफोन (किंवा फॅब्लेट) भारतात येतोय. आजच हा फोन भारतात लॉन्च करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2013, 02:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्वात टिकावू म्हणून नावलौकिक मिळवणारे अनेक फोन ‘नोकिया’ कंपनीनं बाजारात आणलेत. आता, याच कंपनीचा ल्युमिया १५२० हा स्मार्टफोन (किंवा फॅब्लेट) भारतात येतोय. आजच हा फोन भारतात लॉन्च करण्यात आलाय.
भारतात हा बहुप्रतिक्षित असा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच नोकियानं आपल्या सोशल वेबसाईटवर मात्र याबद्दल अगोदरपासूनच हवा तयार केली होती.
नोकिया ल्युमिया १५२० या स्मार्टफोनमध्ये ६ इंचाचा फूल-हाय डेफिनेशन (full-HD) स्क्रीन उपलब्ध आहे. क्वाड-कोअर प्रोसेस आणि २० मेगापिक्सलचा कॅमरा, एलईडी फ्लॅटलाईटसह हा फोन उपलब्ध आहे... आणि हीच या फोनची खासियत ठरतेय. या फोनची आणखी एक खासियत म्हणजे, लाईव्ह म्युझिकही तुम्ही या फोनच्या साहाय्यानं रेकॉर्ड करू शकाल.
१,९२० X १,०८० पिक्सल फूल एचडी स्क्रीनच्या या फॅब्लेटमध्ये २जीबी रॅम उपलब्ध आहे. सध्याचं लेटेस्ट वर्जन असलेलं विंडोज ८ आणि लेटेस्ट अॅप्लिकेशन तुम्हाला या फोनमध्ये मिळणार आहेत. या फोनमध्ये नॉन-रिमूव्हेबल (बाहेर न काढता येऊ शकणारी) Li-lon ३४०० मेगाहर्टझची बॅटरी आहे.
हा फोन लाल, काळा, सफेद आणि पिवळ्या रंगात उपलब्ध आहे. या फोन भारतात तुम्हाला ४६,९९९ रुपयांना उपलब्ध होऊ शकेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.