तुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

Updated: Jun 4, 2016, 06:35 PM IST
तुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या title=

मुंबई : युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

कसं होतं संशोधनाचं स्वरुप...

या मुलांना सोशल मीडियावर काही फोटो दाखवण्यात आले. त्यावर इतर मुलांनी केलेले लाईक्सदेखील दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हे लाईक्स रिसचर्सनी स्वत:च केले होते. मुलांचा मेंदू कसा काम करतोय हे पाहण्यासाठी FMRI स्कॅन करण्यात आले.

तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा मुलांनी स्वत:च्या फोटोवरील लाईक्स पाहिले तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये असंख्य क्रिया घडू लागल्या. विशेषत: 'रिवॉर्ड स्क्रुटरी' या भागात... आपल्या मेंदूचा हा भाग किशोरवयात सर्वांत जास्त संवेदनशील असतो.

इतरांच्या मतांचा परिणाम

रिसर्चमध्ये असे समोर आले की ज्या मुलांच्या फोटोना जास्त लाईक्स होते त्यांना स्वत:लादेखील ते फोटो आवडायला लागले आणि लाईक करावेसे वाटले. तेच दुसरीकडे ज्या मुलांच्या फोटोजना कमी लाईक्स होते त्यांना स्वत:ला ते आपलेत फोटो नाही आवडले. यावरून हे समोर आले की, बाकीच्यांच्या आवडी-निवडीचा त्यांच्या स्वत:च्या आवडीवर किती परिणाम होतो.

सोशल मीडियाचा प्रभाव

याशिवाय हेही दिसून येते आले की, जर अनोळखी मुलांच्या आवडींचा या मुलांवर इतका परिणाम होतो तर या मुलांच्या खऱ्या आयुष्यातील लोकांच्या त्यांच्या विषयीच्या आवडी-निवडीवर किती परिणाम होत असेल. त्यामुळे खऱ्या आयुष्यात किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियाचा किती प्रभाव आहे, हे दिसून येते.

सोशल मीडियाचे जसे चांगले तसेच वाईटही परिणाम आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष किंवा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.