मुंबई : तुमच्या कम्प्युटरवर गूगलचा क्रोम ब्राऊजर इन्स्टॉल केलेला असेल तर सावधान... गूगल तुमच्या कम्प्युटरवरून होणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि तुमची संभाषणं गुपचूपपणे ऐकत असतो... आणि या संभाषणांची ऑडिओ डाटा गूगललाही पाठवतो.
गूगलनं केलेल्या दाव्यानुसार, कंपनीला या रेकॉर्डिंगमुळे लॅंग्वेज रेकग्निशन टूल्स आणि सर्च रिझल्टला सुधारण्यासाठी मदत मिळते.
परंतु, यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला गूगल क्रोमनं तुमची संभाषणं ऐकू नयेत असं वाटत असेल तर त्यासाठीही एक उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमची हिस्ट्री क्लिअर ठेवावी लागेल तसंच व्हॉईस सर्चपासूनही वाचावं लागेल.
आपलं व्हॉईस सर्चला मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्हिटी कंट्रोल पेजवर जावं लागेल. इथं तुम्हाला तुमचं गूगल अकाऊंटमध्ये साईन इन करावं लागू शकतं. इथं टर्न द स्विचला ऑफ करा. व्हॉईस तसंच ऑडिओ अॅक्टीव्हिटी बटन ऑफ झाल्यानंतर व्हॉइस सर्च 'अनॉनिमस आयडेन्टीफायर्स'चा वापर करत स्टोअर होईल. असं केल्यानंतर सूचना गूगल अकाऊंटमध्ये सेव्ह होणार नाहीत.