‘फेसबुक’चा सरकारी कार्यालयांतही बोलबाला!

संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 25, 2013, 11:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत. नवनवीन मित्र, मैत्रिणी भेटतात. नव्या ओळखी होतात आणि त्यात मुख्य भूमिका बजावतंय फेसबुक. जिमेल, ऑरकुट, आयबीबो अशा अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सनंतर आता नवीन ट्रेंड सुरु आहे... तो म्हणजे ‘फेसबुक’चा. परंतु, आता फेसबुकचा अतिवापर होताना दिसत आहे. फेसबुकने लोकांची अगदी झोप उडवून टाकली आहे.
फेसबुकचा अतिवापर होताना दिसत आहे. यामुळेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांत फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकमुळे अनेकांना मन:स्ताप झाला आहे. सुरुवातीला एक मनोरंजन तसेच टाईमपासचे एक साधन म्हणून फेसबुककडे लोक वळायचे. काम चालू असतानाही एका बाजूला फेसबुक चालू ठेवून त्यावर चॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला काम करण्याची पद्धतच झाली आहे. त्यामुळे या सर्वाला आता अधिकारी आणि मालकही त्रासले आहेत. एखादा कर्मचारी काम करता करता फेसबुक वर खेळत तर नाहीत ना? यासाठी आता कार्यालयातही एखादा देखरेखकरी ठेवावा लागत आहे.

महाराष्ट्र सरकारने देखील सरकारी कार्यालयातही फेसबुक पूर्णपणे बंद करण्याचे सांगितलं असून, कोणी फेसबुकवर खेळताना आढळल्यास त्याला दंड लावण्यात येणार आहे. काही लोक फेसबुकवर आपले बनावट अकाऊंट बनवून दुसऱ्याची फसवणूक करत आहेत. अशाप्रकारे फेसबुकचा चांगल्या वापराबरोबर गैरवापर सुद्धा होत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.