लंडनमध्ये धावणार आयआयटी विद्यार्थ्यांची रेस कार!

पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 23, 2013, 06:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणार आहे. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही फॉर्म्युला रेसिंग कार केवळ पाच सेकंदात 0 ते 90 पर्यंतचा वेग शकते. तसंच प्रतितास 90 किमी वेगाने ती धावू शकते. भारतात पहिल्यांदाच डिफरंशिअल इलेक्ट्रॉनिक सिस्टिम या कारमध्ये वापरण्यात आलीय. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 60 विद्यार्थ्यांच्या टीमनं गेली वर्षभर मेहनत करुन ही कार बनवलीय. यासाठी त्यांना सुमारे 15 लाखांचा खर्च आलाय. पुढिल महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या फॉर्म्युला स्टुडंट कार रेसमध्ये ही कार सहभागी होणाराय. जगभरच्या 120 कॉलेजमधील कारही या स्पर्धेत सहभागी होणारेत. स्पर्धेत होणा-या विविध कठोर चाचण्यांमधून या कारला आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे.

दुस-याच प्रयत्नात या विद्यार्थ्यांनी आपली रेसिंग कार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठवलीय. आयआयटीमधील शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्षात आणताना येणारा अनुभव आनंददायक असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
आयआयटी ही बुध्दीवंतांची खाण समजली जाते आणि या खाणीतून निघालेले हिरे सध्या जगभरात चमकतात. त्याच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवण्यास सज्ज झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.