फेसबुकवर 'हॅशटॅग'चे वेलकम

फेसबुकयुझरसाठी एक आनंदाची बातमी. फेसबुक सादर करतेय हॅशटॅगची सुविधा.आतापर्यंत ट्विटर, इन्स्टाग्राम मध्ये वापरण्यात येणारा हॅशटॅग आता फेसबुकवर दाखल होतोय.

Updated: Jun 13, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेसबुक युझर्ससाठी एक आनंदाची बातमी... आता फेसबुकवरही हॅशटॅगची सुविधा दाखल होतेय. आतापर्यंत ट्विटर, इन्स्टाग्राममध्ये वापरण्यात येणारा हॅशटॅग आता फेसबुकवरही दाखल होतोय.

काय आहे हे हॅशटॅग?
हॅशटॅगचे चिन्ह # हे आहे. आपल्याला ज्या विषयाची माहिती हवीय त्या शब्दापुढील हॅशटॅगवर क्लिक केल्यास त्या विषयाबद्दलची माहितीच नाही तर लोकांची मते आणि त्यांनी केलेली चर्चाही आपण वाचू शकतो. यामुळे आपण मोठ्या प्रमाणात संवादाद्द्वारे लोकचर्चेत सामील होऊ शकतो. शब्दांपुढे हॅशटॅक दिल्यास त्या शब्दाचं रुपांतर एका लिंकमध्ये होतं आणि या लिंकवर क्लिक केल्यास त्या शब्दाशी संबंधित सध्याची चर्चा तुम्हाला दिसते.

हॅशटॅगचा फेसबुक युझरर्सना बराच फायदा होणार आहे. एखाद्या विषयाच्या माहितीबरोबरच आपल्या मित्रमैत्रिणींची त्याबद्दलची मते, त्यांना माहीत असलेल्या गोष्टी या हॅशटॅगच्या एका क्लिकवर मिळू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.