राधिका मर्चंट लवकर अंबानी कुंटुबियांची छोटी सून होणार आहे. 12 जुलै रोजी राधिका आपल्या लहानपणीच्या मित्राशी अनंत अंबानीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वीच्या काही विधी एँटिलियामध्ये सुरु झाल्या आहेत. 'मामेरु' कार्यक्रमात राधिका मर्चंटला लूक खास होता. यामध्ये तिचा लेहंगा आणि तिने कॅरी केलेली ज्वेलरी चर्चेचा विषय ठरले.
राधिका मर्चंटने यावेळी आपल्या फॅशनला खास पर्सनल टच दिला होता. राधिका मर्चंटचा आऊटफिट आणि तिचे दागिने खास होते.
राधिकाचे आतापर्यंतचे सगळे लूक्स रिया कपूरने स्टाइल केले होते. मनीष मल्होत्राने तयार केलेल्या वायब्रंट बांधनी लेहग्यांमध्ये राधिका दिसली. गुलाबी अशा लेहंग्यावर बनारसी ब्रोकेडवर राय बंधेज झालं आहे. सोन्याच्या तारेने जरदोजी कढाई बनवून हा क्लासिक लूक तयार केला होता. यामध्ये राधिका अतिशय सुंदर दिसत होती.
राधिकाचा हा लूक कस्टम डिझाइन केला आहे. यावेळी राधिकाने गुलाबी लेहंग्यावर भगव्या रंगाचा ब्लाऊज कॅरी केला होता. पण ब्लाऊजचं वेगळेपण म्हणजे विटेंज स्टाइल कोटी पद्धतीने हा शिवला होता. ज्यामध्ये नेकलाइनच्या खाली बटण लावले होते. तर स्लीव्सवर गोल्डन बीट्स लटकत आहेत. भगव्या ब्लाऊजच्या खाली कोटी लूक देण्यासाठी बॉर्डर ग्रीन रंगाची कढाई डिझाइनची बॉर्डरची फिनिशिंग दिली आहे. तसेच या ब्लाऊजला साइडमध्ये कट दिला आहे. यामुळे याचा लूक खास दिसत आहे.
राधिकाचा लेहंगा बनवण्यासाठी 35 मीट बांधणीच्या कपड्याचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये कमाल घेर तयार करण्यात आलाय. या लेहंग्यातील खास गोष्ट म्हणजे त्याची बॉर्डर. या बॉर्डरला लहान मोठ्या डिझाइनने मोठी बनवण्यात आली आहे. या बॉर्डरवर आई दुर्गेचा श्लोक कढाईच्या डिझाइनमध्ये लिहिला आहे.
राधिकाने तिची आई शैला वीरेन मर्चंटचे दागिने घालून हा लूक कम्प्लिट केला . राधिकाने तिच्या आईचा हार, मॅचिंग कानातले आणि मांग टिक्का घातला आहे. राधिकाने यावेळी तिच्या वेणीमध्ये हेअर एक्सेसरी देखील जोडले. ज्याच्या मध्यभागी लहान मुलासारखी रचना देखील होती. तर राधिकाने तिच्या लेहेंगाच्या लूकला तिच्या बांगड्यांनी शेवटचा टच दिला.