फेसबुकवर 10 करोड नकली अकाऊंटस्?

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलवर 10 करोडपेक्षा जास्त नकली (डुप्लिकेट) अकाऊंटस् असण्याची शक्यता आहे....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 5, 2014, 09:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलवर 10 करोडपेक्षा जास्त नकली (डुप्लिकेट) अकाऊंटस् असण्याची शक्यता आहे....
मुख्य म्हणजे यातले बहुतेक अकाऊंट भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अधिक आहेत. कंपनीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार जगभरात या पोर्टलवर 50 लाख ते 1.5 करोड किंवा त्यापेक्षा जास्तही अकाऊंट रजिस्टर आहेत.
फेसबुकनं एसईसीला ही सूचना दिलीय. यानुसार, या पोर्टलवर असेही लोक आहेत ज्यांनी पोर्टलच्या काही नियमांचं उल्लंघन करत फेसबुकवर एकपेक्षा जास्त अकाऊंटस् बनवले आहेत. उदाहरण द्यायचंच झालं तर 2013 मध्ये जगभरात महिन्यातील सक्रीय उपभोगकर्त्यांच्या (एमएयू) नकली अकाऊंटसची संख्या 4.3 टक्क्यांहून 7.9 टक्क्यांवर पोहचल्याची शक्यता आहे. नकली किंवा डुप्लिकेट फेसबुक अकाऊंट म्हणजे एखाद्या उपभोगकर्त्यानं आपल्या मुख्य प्रोफाईलसोबतच इतर प्रोफाईल बनवून ठेवलेल्या आहेत.
फेसबुकच्या नवीन मासिक रिपोर्टनुसार, अशा नकली अकाऊंटसची संख्या भारत आणि तुर्कीसारख्या विकासनशील देशांत अधिक आहे. यानुसार, 31 मार्च 2014 पर्यंत फेसबुकचे 1.28 अरब एमएयू होते. हीच संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी अधिक आहे. तसंच पहिल्या तिमाही (2014) मध्ये यामध्ये भारत आणि ब्राझीलच्या उपभोगकर्त्यांचं अधिक सहभाग होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.