डमी विद्यार्थी पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईतील बड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी डमी विद्यार्थी बनून बसणा-या एका मोठ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय. यासाठी ही टोळी एका परिक्षे़चे एक लाख रुपये घ्यायची.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 2, 2013, 11:31 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील बड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी डमी विद्यार्थी बनून बसणा-या एका मोठ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय. यासाठी ही टोळी एका परिक्षे़चे एक लाख रुपये घ्यायची.
प्रवेश परीक्षा देण्यासाठी या टोळीकडे मोठ्या प्रमाणात बोगस परीक्षार्थी असल्याचं तपासात पुढे आलंय. एमबीए, कॅट, जीएमआयटी, त्याचबरोबर एमबीबीएसच्या प्रवेश परीक्षांमध्ये ही टोळी बोगस विद्यार्थी बसवायची. मुंबईतील एनएम कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत ७५ बोगस विद्यार्थी यांनी बसवले होते.

विशेष म्हणजे ही टोळी बोगस कॉलेज आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड बनवायची. मुंबईतील अनेक मोठ्या कोचिंग क्लासेसच्या मदतीनं ही टोळी हा धंदा चालवायची. या टोळीची उच्च शिक्षित तरुणांची मोठी फौज आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी अशा प्रकारे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवत होती. त्यामुळे पोलीस अशा विद्यार्थ्यांचा तपास करतंय.