...ही पाहा ऑडीची 1.13 कोटींची कार!

‘ऑडी इंडिया’ या कंपनीनं नुकतीच आपली ‘ए 8 एल’ ही नवी कोरी, महागडी पण पॉश कार बाजारात उतरवलीय. या कारची दिल्लीत किंमत आहे 1,12,95,000 रुपये तर मुंबईत या कारची किंमत आहे 1,11,43,000रुपये....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2014, 12:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘ऑडी इंडिया’ या कंपनीनं नुकतीच आपली ‘ए 8 एल’ ही नवी कोरी, महागडी पण पॉश कार बाजारात उतरवलीय. या कारची दिल्लीत किंमत आहे 1,12,95,000 रुपये तर मुंबईत या कारची किंमत आहे 1,11,43,000रुपये....
काही काळापासून देशात वाहन खरेदीदारांचा उत्साह ओसरलेला दिसतोय. पण, लक्झरी कारची मात्र बाजारात चलती आहे. याच धर्तीवर ‘ऑडी इंडिया’नं आपली ही नवीन कार बाजारात दाखल केलीय. ‘ऑडी इंडिया’च्या वतीने यासंदर्भातील माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. केवळ कॅलेडर वर्षच नव्हे, तर आर्थिक वर्षातदेखील ऑडीने भारतात 10 हजार वाहन विक्रीचा आकडा पार केला आहे.

सामान्य गाड्यांकडे पाठ फिरवणारे ग्राहक ऑडीसारख्या कंपनीच्या महागड्या गाड्या खरेदी करण्यास उत्सुक असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. आता ऑडीची नवी `ए 8 एल` ही आलिशान गाडी बाजारात आल्याने ग्राहक अधिकच कंपनीकडे आकर्षित होतील आणि आम्ही बाजारातील आपले स्थान अधिकच बळकट करू, असा दावा ऑडी इंडियाचे प्रमुख जोए किंग यांनी केला आहे. `ए 8 एल` या नव्या गाडीचे फिचर्स आणि त्यातील वैशिष्ट्ये अद्यापी कंपनीने जाहीर केली नाही. लवकरच ही कोट्यवधीची गाडी रस्त्यावर धावणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.