`एअरटेल`ची थ्रीजी सेवा ग्राहकांसाठी पुन्हा एकदा हजर!

‘एअरटेल’च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे... एअरटेल लवकरच, आठ शहरांत पुन्हा एकदा थ्रीजी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे, या शहरांतील ग्राहकांना थ्रीजी सेवेचा म्हणजेच गतीशील इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 5, 2014, 01:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
‘एअरटेल’च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे... एअरटेल लवकरच, आठ शहरांत पुन्हा एकदा थ्रीजी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे, या शहरांतील ग्राहकांना थ्रीजी सेवेचा म्हणजेच गतीशील इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.
दूरसंचार न्यायालयानं टीडीसॅटद्वारे शहरांमध्ये थ्रीजी रोमिंग सेवा उपलब्ध करण्याच्या निर्णयाला वैध करार दिलंय. त्यामुळे, या निर्णयानंतर एअरटेलनं आठ मोठ्या शहरांत थ्रीजी सेवा सुरू करण्याची घोषणा केलीय.
सोमवारपासून एअरटेलची थ्रीजी सेवा महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कोलकात आणि उत्तरप्रदेशमध्ये सुरू होईल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रिपेड ग्राहकांना या सेवेचा त्वरीत लाभ घेता येणार आहे तर पोस्टपेड ग्राहकांना मात्र या सेवेसाठी थोडी वाट पाहावी लागेल.
दिल्लीमध्ये टीडीसॅटच्या एका खंडपीठानं एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांच्यात झालेल्या थ्रीजी ‘आयसीआर’ (इन्ट्रसर्ल रोमिंग) करारामुळे लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन होत नाही. त्यानंतर एअरटेलनं हा निर्णय जाहीर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.