२० सेंकदात करा मोबाइल चार्जिंग !

दिवसभर कामाच्या धावपळीत असणा-यांसाठी मोबाईल किती गरजेचा आहे हे सांगायला नको...मात्र इंटरनेटपासून सगळ्या गोष्टी मोबाईलवर वापरणा-यांसाठी व्याप असतो तो वेळ काढून मोबाईल चार्ज करण्याचा.

Updated: May 21, 2013, 01:06 PM IST

www.24taas.com, झी, मीडिया, वॉश्गिंटन
दिवसभर कामाच्या धावपळीत असणा-यांसाठी मोबाईल किती गरजेचा आहे हे सांगायला नको...मात्र इंटरनेटपासून सगळ्या गोष्टी मोबाईलवर वापरणा-यांसाठी व्याप असतो तो वेळ काढून मोबाईल चार्ज करण्याचा...पण तुमचा स्मार्ट मोबाईल फोन फक्त 20 सेकंदात चार्ज होईल असं तुम्हाला कुणी सांगितलं तर...
अर्थातच तुमचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य केलं आहे कॅलिफोर्नियात राहणा-या मराठमोळ्या इशा खरेनं....फक्त 20 ते 30 सेकंदात तुमचा मोबाईल पूर्णपणे चार्ज करु शकेल अशा सुपर कपॅसिटर उपकरणाचा शोध लावलाय 18 वर्षीय ईशा खरेनं...भारतीय-अमेरिकन असलेल्या ईशाला तिच्या या शोधासाठी इंटेल फाऊंडेशनच्या `यंग सायंटिस्ट अवॉर्ड`ने गौरवण्यात आलंय. या कामगिरीबद्दल तिला इंटेलकडून 50 हजार डॉलर्सचं पारितोषिक मिळालं आहे...त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गूगलनेही तिच्या या क्रांतीकारी संशोधनाची दखल घेतलीय.
ईशाच्या या उपकरणाचं आयुष्य 10 हजार चार्ज-रिचार्ज सायकल एवढे आहे. सध्या या कपॅसिटरच्या चाचण्या सुरु आहे...लवकरच तो मोबाईल आणि अन्य उपकरणांसाठी वापरता येणार आहे....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.