www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अॅपलच्या लेटेस्ट आयपॅड एअर आणि रॅटिना डिस्प्ले असलेल्या आयपॅड मिनीची भारतात विक्री सुरु झालीय. मुंबईत लोअर परळ भागात अॅपलने एक जंगी लॉन्चिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे, विक्री सुरु झाल्यानंतर या ठिकाणी ठेवण्यात आलेले सर्व आयपॅड केवळ तीन तासांमध्ये विकले गेले.
या टॅबची किंमत २८ हजार रुपयांपासून सुरू होते. ‘आयपॅड मिनी २’ मध्ये २०४८ X १५३६ पिक्सल रिझॉल्यूशन आहे. या शिवाय ७.९ इंचाची स्क्रीन असून आयपॅड मिनी २ गुगलच्या नेक्सस ७ (२) या टॅबलेटला टक्कर देऊ शकतो.
‘आयपॅड मिनी २’मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. तसेच त्यात अॅपलच्या ६४ बीट ए-७ प्रोसेसरमुळे स्पीडही वाढलेला, तुम्हाला आढळून येईल, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय ‘आयपॅड मिनी २’मध्ये २ जीबी रॅम आहे. तसंच ८ मेगापिक्सेल कॅमेऱ्याची सुविधाही या टॅबमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यात फ्रंट कॅमेराही यात उपलब्ध आहे.