जिओनीचा नवीन स्मार्टफोन आता ७,४९९ रुपयांना!

जिओनी कंपनीने पायोनियर - पी ३ नावाचा नवा अॅण्ड्राईड ड्युअल सिमकार्ड असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये १.४ गिगा हर्टझ् क्वाड कोअर प्रोसेसर उपलब्ध असून त्यातून अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून आपल्याला जास्त कार्यक्षमता आणि कामगिरी मिळते.

Updated: Dec 10, 2013, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिओनी कंपनीने पायोनियर - पी ३ नावाचा नवा अॅण्ड्राईड ड्युअल सिमकार्ड असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये १.४ गिगा हर्टझ् क्वाड कोअर प्रोसेसर उपलब्ध असून त्यातून अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून आपल्याला जास्त कार्यक्षमता आणि कामगिरी मिळते. या स्मार्टफोनमध्ये ४.३ इंचांचा एचडी डिस्प्ले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन केवळ ७,४९९ रु. मिळणार आहे.
यामध्ये अॅण्ड्राईड जेली बीन व्ही ४.२ असून अमिगो इंटरफेस आहे. या स्मार्टफोनला एलईडी फ्लॅशसह पाच मेगापिक्सेलचा ऑटोफोक्स बॅक कॅमेरासुद्धा आहे. १७०० एमएएच बॅटरी आणि ५१२ एमबीचा रॅम आहे. तसेच ३२ जीबी एक्स्पाडेबल मेमरीची सोय आहे... तसंच हा फोन पर्ल व्हाइट आणि स्टनिंग ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती सिन्टेक टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेडचे संचालक अरविंद वोहरा यांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ