www.24taas.com, कोलंबो
टी-20 विश्वचषकाची सेमी फायनल न गाठणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे.
विश्व चषकाच्या पाच सामन्यांत चार विजय मिळवल्याने भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. क्रमवारीत श्रीलंका 129 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे तर भारत 120 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेची टीम 9 गुणांच्या आघाडीसह नंबर वनच्या सिंहासनावर आहे. भारतानंतर पाकिस्तान (118) आणि इंग्लंड (118) असून, दक्षिण आफ्रिकेने नंबर वनचे स्थान गमावले आहे. वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये द. आफ्रिकेला एकही सामना जिंकता आला नाही.
फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने 9 स्थानांच्या प्रगतीसह 10 वे स्थान मिळवले. कोहलीने वर्ल्डकपमध्ये पाच सामन्यांत 185 धावा काढल्या.
गोलंदाजांत हरभजनसिंग टॉप-20 बाहेर पडला आहे. तो आता 23 व्या स्थानी आहे. अश्विन 25 व्या स्थानी पोहोचला आहे. फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन दुस-या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्लुन नंबर वन फलंदाज म्हणून कायम आहे. विंडीजचा गेल तिस-या स्थानी तर श्रीलंकेचा महेला जयवर्धने चौथ्या क्रमांकावर आहे.
टी-20 क्रमवारी
क्र. देश गुण
1. श्रीलंका 129
2. भारत 120
3. पाकिस्तान 118.
4. इंग्लंड 118.
5. द. आफ्रिका 117.
6. ऑस्ट्रेलिया 111.
7. वेस्ट इंडीज 111
8. न्यूझीलंड, 97
9. बांगलादेश 85
10. आयर्लंड 82.