माहीच्या चुका पडल्या भारी, इंडिया गेली घरी...

माहीचं चुकीचे निर्णय आणि रणनीतीचा फटका भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये बसला आणि टीम इंडियाला वर्ल्ड कपमधूनच पॅकअप कराव लागलं.

Updated: Oct 3, 2012, 09:42 PM IST

www.24taas.com, कोलंबो
माहीचं चुकीचे निर्णय आणि रणनीतीचा फटका भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये बसला आणि टीम इंडियाला वर्ल्ड कपमधूनच पॅकअप कराव लागलं. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढाई जिंकली मात्र वर्ल्ड कपच्या युद्धातून आऊट झाला...कॅप्टन धोनीच्या चुकीच्या रणनीतीमुळे ज्या मॅचमध्ये टीम इंडियाला मोठा विजय मिळवायचा होता त्या मॅचमध्ये केवळ १ रननं विजय मिळवता आला.... आणि त्यामुळेच वर्ल्ड कपमधूनही पॅकअप झालं...
कॅप्टन धोनीची पहिली चूक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच स्पेशलिस्ट स्पिनर्ससह मैदानात
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कॅप्टन धोनीनं केवळ आर अश्विनला खेळवलं. आणि त्याचा फटका भारतीय टीमला सर्वाधिक बसला. फिरकीविरुद्ध खेळणं ही दक्षिण आफ्रिकेची कमकुवत बाजू. हे माहित असतानाही माहीनं आफ्रिकेविरुद्ध तीन फास्ट बॉलर्ससह मैदानात उतरला...केवळं एकचं स्पेशिलिस्ट स्पिनर्सला खेळवलं. आणि त्याचाच फटका भारतीय टीमला सर्वाधिक बसला. फास्ट बॉलर्सची दक्षिण आफ्रिकनं बॅट्समननी चांगलीच धुलाई केली.
कॅप्टन धोनीची दुसरी चूक

अश्विनला उशिरानं आणले बॉलिंगला

स्पेशलिस्ट आर.अश्विनऐवजी रोहित शर्माला माहीनं अगोदर बॉलिंगची दिली. आणि रोहितच्या त्याच एका ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं १३ रन्स काढलेआर अश्विनचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला बॉलिंगला लवकर आणण्याची गरज होती..मात्र माहीनं त्यासाठी ९ ओव्हरपर्यंत का वाट पाहिली हे न उलगडणार कोडचं....आणि माहीच्या याच चुकीच्या रणनीतीचा टीमला फटका बसला.

कॅप्टन धोनीची तिसरी चूक
दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी आक्रमक रणनीतीची अभाव
भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर १५२ रन्संच आव्हान ठेवलं होतं मात्र भारताला वर्ल्ड कपमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 1१२१ रन्सवर रोखण्याची गरज होती.मात्र कॅप्टन माहीला त्याकरता सुरुवातीपासून आफ्रिकेवर दडपण ठेवता आलं नाही...
वास्तविक दक्षिण आफ्रिकेच्या ओपनर्सला झटपट आऊट केल्यानंतर धोनीनं दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढवण्यासाठी स्पिनर्सना बॉलिंग देण्याची गरज होती...मात्र माहीनं फार उशीरा स्पिन ऍटॅक सुरु केला..तिथपर्यंत आफ्रिकनं टीमनं फास्ट बॉलर्सविरुद्ध वेगानं धावा जमवून स्वत:वरील दडपण कमी केलं होतं.. पहिलं टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सलग तीन टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा परफॉन्स फ्लॉप राहिलाय.धोनीनं प्रत्येक वेळेस पराभवाचा खापर दुस-यांवर फोडलं...मात्र धोनीची चुकीची रणनीतीच टीम इंडियाच्या पराभवांना जबाबदार असल्याच दिसून येतंय...