सैय्यद मुश्ताक अली टी20मध्ये युवराजचा धुमाकूळ

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये युवराजनं एक सेंच्युरी झळकवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केला.

Updated: Feb 16, 2017, 08:36 PM IST
सैय्यद मुश्ताक अली टी20मध्ये युवराजचा धुमाकूळ  title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये युवराजनं एक सेंच्युरी झळकवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केला. यानंतर पुन्हा एकदा युवराजनं त्याचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सैय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेमध्ये युवराजनं लागोपाठ तीन उत्तूंग सिक्स मारल्या.

सेन्ट्रल झोनच्या विरुद्ध नॉर्थ झोनकडून खेळताना युवीनं 20 बॉलमध्ये 33 रन केल्या. युवराजच्या या खेळीमध्ये चार सिक्सचा समावेश होता. सेंन्ट्रल झोननं पहिले बॅटिंगचा निर्णय घेत 20 ओव्हरमध्ये 167 रन केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना युवराजनं तुफान फटकेबाजी केली तरीही नॉर्थ झोनचा चार रननी पराभव झाला.

पाहा युवराजची फटकेबाजी