नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला स्थान देण्यात आलंय. तब्बल २१ महिन्यांनंतर युवराजने संघात पुनरागमन केलंय. अभिनेत्री हेजल कीज युवराजसाठी लकी ठरल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. या लेडी लकमुळेच युवराजला पुन्हा संघात पुनरागमन करता आलं अशी त्यांची भावना आहे.
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत युवराज दमदार कामगिरी करतोय. सर्व्हिसविरुद्धच्या सामन्यात युवराजने ९८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. युवराजला संघात स्थान मिळाल्यानंतर हेजलनेही आनंद व्यक्त केलाय.
युवराजच्या पुनरागमनाच्या बातमीमुळे खूप आनंद झालाय आणि खूप आभारीही आहे, असे तिनं ट्विटरवर म्हटलयं. तसेच मेहनत, धैर्य आणि कठोर परिश्रमामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आलंय. युवराज याचा हकदार होता. वेल डन, असंही तिनं पुढे म्हटलंय.
Thrilled and excited by the news! Grateful and ecstatic at the same time! #teamyuvi #goteamyuvi #number12 going to Australia-aa @Imangadbedi
— Hazel Keech (@hazelkeech) December 19, 2015
... Work, patience, persistence and perseverance thats got him picked! Hes deserves this!! Well done boy @YUVSTRONG12 @Imangadbedi
— Hazel Keech (@hazelkeech) December 19, 2015