दीड वर्षानंतर युवराज दिसणार मैदानावर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटसाठी युवराज सिंगने टीममध्ये जबरदस्त  कमबॅक केलं आहे.

Updated: Dec 19, 2015, 10:20 PM IST
दीड वर्षानंतर युवराज दिसणार मैदानावर title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटसाठी युवराज सिंगने टीममध्ये जबरदस्त  कमबॅक केलं आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे युवराज सिंगसाठी टीमचे दरवाजे उघडे झाले. युवराजने 6 एप्रिल 2014 ला श्रीलंकेविरोधात ढाका येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर 1 वर्ष 8 महिन्यांनंतर युवराज हा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरोधात खेळताना मैदानात दिसणार आहे.

11 डिसेंबर 2013 ला दक्षिण आफ्रिकेविरोधात युवराजने शेवटचा वनडे सामना खेळला आहे.  त्यानंतर त्याला वनडेत संधी मिळाली नाही. तर 5 ते 9 डिसेंबर दरम्यान तो कोलकाता येथे इंग्लडविरोधात शेवटचा सामन्यात खेळला आहे.

आयपीएलमध्ये युवीने याच वर्षी 17 मे 2015 ला रॉयल चॅलेंजर विरोधात बॅंगलोर येथे अंतिम सामना खेळला आहे.