कुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत

रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Updated: Aug 21, 2016, 05:31 PM IST
कुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

पहिल्याच फेरीत योगेश्वरचा मंगोलियाच्या गँगझोरिगकडून 3-0 असा पराभव झाला. 

योगेश्वरने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.