ईशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट'

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा वर्ल्डकपमधून 'आऊट' झालाय. कारण तो दुखापतग्रस्त असल्याने अनफिट ठरलाय. त्यामुळे संघात स्थान मिळने कठिण झालेच.

Updated: Feb 7, 2015, 07:41 PM IST
 ईशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट' title=
छाया - डीएनए

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा वर्ल्डकपमधून 'आऊट' झालाय. कारण तो दुखापतग्रस्त असल्याने अनफिट ठरलाय. त्यामुळे संघात स्थान मिळने कठिण झालेच.

ईशांत शर्मा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. डिसेंबरपासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम १५ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. मात्र आज झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो अनफिट ठरल्याने त्याला स्पर्धेत खेळता येणार नाही. 

दरम्यान आता ईशांतऐवजी मोहित शर्माला संघात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.