कोण खेळणार कोणाशी क्वार्टर फायनल

 वर्ल्ड कप २०१५मध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले असून त्या सामन्यातील गुणांच्या आधारावर कोण कोणाशी क्वार्टर फायनलमध्ये भिडणार याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच उर्वरित आठ सामन्यांनंतर हे चित्र स्पष्ट होईल, पण आताच्या परिस्थिती कोण भिडणार याचा हा अंदाज

Updated: Mar 11, 2015, 08:30 PM IST
कोण खेळणार कोणाशी क्वार्टर फायनल  title=

मुंबई :  वर्ल्ड कप २०१५मध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले असून त्या सामन्यातील गुणांच्या आधारावर कोण कोणाशी क्वार्टर फायनलमध्ये भिडणार याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच उर्वरित आठ सामन्यांनंतर हे चित्र स्पष्ट होईल, पण आताच्या परिस्थिती कोण भिडणार याचा हा अंदाज

# ए ग्रुपची सद्यस्थिती न्यूझीलंड १० गुण, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश ७ गुण, आणि श्रीलंका ६ गुणांसह क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. 

# बी ग्रुपमध्ये भारत पाच विजयांसह १० गुणांमुळे क्वार्टर फायनलमध्ये पात्र झाला आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि आयर्लंड यांनी तीन विजयांसह ६ गुण मिळविले आहेत. वेस्ट इंडिज ४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

# ए ग्रुपमध्ये न्यूझीलंडचा पुढील सामना बांगलादेशशी आहे. त्यामुळे हा सामना जिंकून न्यूझीलंड १२ गुण मिळविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशचे ७ गुण राहतील. 

# ए ग्रुपमधील श्रीलंकेचा पुढील सामना स्कॉटलंडशी आहे. हा सामना जिंकून श्रीलंका तिसऱ्या स्थानावर जाण्यास उत्सुक आहे. 

# ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलियाचा अंतीम सामनाही स्कॉटलंडशी आहे. त्यामुळे हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 

# वरील सर्व शक्यता तंतोतंत खऱ्या ठरल्यास साखळी सामन्यांच्या अखेरीस ए ग्रुप अशा प्रकारे असू शकतो, न्यूझीलंड १२, ऑस्ट्रेलिया ९, श्रीलंका ८ आणि बांगलादेश ७ असे क्वार्टर फायनलमधील संघ अनुक्रमे असू शकतात. 

# बी ग्रुपमध्ये भारताचा अखेरचा सामना झिम्बाब्वेशी आहे. भारत सर्व सामने जिंकून १२ गुण मिळविण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

# बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना यूएईशी आहे. त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे ८ गुण होतील. १.४६ च्या रन रेटच्या आधारावर ते दुसऱ्या क्रमांकावर जातील. 
#  बी ग्रुपमध्ये वेस्ट इंडिजचा अखेरचा सामना यूएईशी आहे. वेस्ट इंडिजला हा सामना मोठ्या फरकाने आणि चांगल्या रन रेटने जिंकणे आवश्यक आहे. वेस्ट इंडिजने हा सामना जिंकल्या त्यांचे ६ गुण होतील. सध्या त्याचे ४ गुण असून -०.५१ रन रेट आहे. 

# बी ग्रुपमध्ये पाकिस्तानचा अखेरचा सामना आयर्लंडशी आहे. यात जो जिंकणार तो बी ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जाईल. पाकिस्तान सामना जिंकल्यास तो तिसऱ्या क्रमांकावर जाईल. पराभूत झाल्यास पाकिस्तानला घरचा रस्ता पकडावा लागेल. 

# वरील परिस्थितीनंतर क्वार्टर फायनलचे सामने पुढील प्रमाणे 

१) न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज / आयर्लंड 
२) ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान 
३) श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका 
४) भारत वि. बांगलादेश

# वरील प्रमाणे जर देश क्वार्टर फायनलमध्ये आले आणि या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानने चांगली कामगिरी केली तर भारत पाकिस्तान फायनल होऊ शकते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.