टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला

वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला.

Updated: Mar 2, 2016, 05:32 PM IST
टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला title=

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला दिली आहे. वीरेंद्र सेहवाग म्हणतो, "माझ्या मते रोहित आणि विराट यांनी सलामीला यावे. या दोघांनी सात ते आठ षटके खेळून काढली, तरी भारताला कोणी रोखू शकत नाही". 

भारतीय क्रिकेट संघात जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे, त्यामुळे आगामी ट्वेंटी-20 वर्ल्डकपला भारतच मजबूत दावेदार असल्याचंही सेहवागने म्हटलंय.

'टीम इंडियात फलंदाजांचा क्रम मोठा आहे आणि गोलंदाजांचीही कामगिरी उत्तम होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेसारखे बॅटसमन टीम इंडियात आहेत. तर, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा हे जलदगती आणि जडेजा, अश्विनसारखे फिरकी बॉलर संघात असल्याने भारतच या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार आहे', असं सहवाग म्हणाला.